२००६ मध्ये सुरू झालेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा ११व्या पर्वाचा प्रवास काल संपला. हिंदीत प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 'बिग बॉस'चं तमिळ वर्जनही खूप गाजलं. अन् आता बिग बॉस पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांसाठी लवकरच मराठी बिग बॉस सुरु होणार असल्याची अधिकृत घोषणा सलमान खाननं बिग बॉस ११च्या ग्रँड फिनालेमध्ये केली. भाभीजी घर पर है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'अंगुरी भाभी' अर्थात मराठमोळ्या शिल्पा शिंदेनं 'बिग बॉस ११' चे जेतेपद पटकावलं. मराठी प्रेक्षकांचा बिग बॉसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून मराठी बिग बॉस सुरू करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. मराठी बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मराठमोळा आणि सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुखकडं दिली जाण्याची शक्यता आहे. रितेशनं याआधी 'विकता का उत्तर' या टीव्ही शोचं सूत्रसंचालनही केलं होतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews